नवलेखक अनुदान योजनेसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील मराठी भाषेतील नवलेखकांना ललित वाङ्‌मयाच्या प्रकाशनासाठी साहित्य संस्कृती मंडळातर्फे दरवर्षी अनुदान देण्यात येते. त्यासाठी 1 ते 31 जानेवारी 2019 पर्यंत नवलेखकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

काव्यसंग्रह, नाटक/एकांकिका, ललित गद्य/वैचारिक, कथासंग्रह, कादंबरी, बालवाङ्‌मय या साहित्य प्रकारांसाठी अनुदान देण्यात येते. या अनुदानाच्या निर्णयासाठी साधारण: एक वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे लेखकाने या काळात मंडळाशी पत्रव्यवहार करू नये. साहित्याच्या गुणवत्तेबद्दल तज्ज्ञांनी दिलेला निर्णय अंतिम असेल, असे साहित्य संस्कृती मंडळाने कळवले आहे.

नवलेखकांसाठी www.msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अधिक माहिती आणि अर्जासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाशी (रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई - 400025, दूरध्वनी - 24325931) संपर्क साधता येईल.

Web Title: Navlekhak Subsidy Scheme Form