
मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करू नका - किशोरी पेडणेकर
नवनीत आणि रवी राणा या दांपत्याने आज मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा चंग बांधला आहे. पण त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं असून त्या अनुषंगाने मातोश्री आणि परिसरातला बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. यावरून आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दाम्पत्याला सुनावलं आहे. (Kishori Pednekar Latest News)
हेही वाचा: राणा पती-पत्नीला रोखण्यासाठी शिवसैनिकांची मुंबई टोल नाक्यांवर फिल्डिंग
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "राणा दाम्पत्य हे नौटंकी करत आहे. ते सुपारी बहाद्दर दाम्पत्य आहे. अपक्ष आमदार आणि खासदार यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्याचे कारण काय ? जनतेचा पैसा असा कुठेही खर्च केला जातो का ? ठीक आहे त्यांच्या जीवाला धोका आहे तर त्यांनी सिक्युरिटी घ्यावी. तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायचे असेल तर एखाद्या मंदिरात जा किंवा अन्य कुठेही जा पण मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करू नका. शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. तुमचा मतदारसंघ हा अमरावती आहे तिथे लक्ष द्या.
हेही वाचा: हनुमान चालीसा पठणाचा विषय तापला, राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेना आक्रमक
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, "हे सुपारी बाज दाम्पत्य कसला गनिमीकावा करणार ? याला नीच आणि घाणेरडा कावा म्हटले पाहिजे. हिंदुत्व हे आमच्या रक्तात आहे हिंदुत्व हा आमचा ध्यास आहे हिंदुत्व आमचा श्वास आहे आम्हाला हनुमान चालीसा मुखोद्गत आहे तेव्हा ही नौटंकी बंद करा."
Web Title: Navneet Rana Ravi Rana Kishori Pednekar Mumbai Hanuman Chalisa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..