esakal | नवी मुंबई : फळांची मागणी वाढली; दर स्थिर | Fruit demand
sakal

बोलून बातमी शोधा

Fruits

नवी मुंबई : फळांची मागणी वाढली; दर स्थिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : नवरात्रोत्‍सवात (navratri festival) अनेकजण नऊ दिवस उपवास करीत असल्‍याने फलाहाराकडे कल असतो. बाजारात फळांना (fruits demand) मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर (rates stable) आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्‍यामुळे (rainfall) फळांचे उत्‍पादनही (fruit production) भरपूर आले आहे. ऑक्टोबर महिन्यात पपई, खरबूज, कलिंगड, डाळिंब, सीताफळ या फळांची आवक वाढते.

हेही वाचा: मुंबईतील रुग्णवाढीवर लक्ष; चार वेळा रुग्णसंख्या पाचशेच्या वर

नवरात्रोत्‍सवामुळे बाजारात फळांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. अननस ३२ ते ४० रुपये किलो, डाळिंब ६० ते १२० रु किलोच्या घरात आहेत. सीताफळ २० ते ७० रु. किलो, पपई १५ ते २० रु. किलो आहेत आणि कलिंगडही १५ ते २० रु. किलो आहेत. खरबूज २० ते ३५ रु. किलो असल्‍याची माहिती फळांचे घाऊक व्यापारी अशोक उंडे यांनी दिली आहे. तर किरकोळ बाजारात दर चढेच आहे.

सफरचंदाची चलती

बाजारात भारतीय सफरचंदाची चांगली आवक होत आहे. सध्या सिमल्यावरून येणाऱ्या सफरचंदाचा हंगाम संपला असून हिमाचली सफरचंदाची आवक सुरू झाली आहे. सफरचंद घाऊक बाजारात ५० ते ९० रुपये किलोपर्यंत विकली जात आहेत. हीच सफरचंद किरकोळ बाजारात ७० ते १३० रुपये किलोच्या घरात मिळत आहेत.

loading image
go to top