esakal | मुंबई : केईएम रुग्णालयात स्त्री शक्तीचा सन्मान | KEM Hospital
sakal

बोलून बातमी शोधा

KEM Hospital

मुंबई : केईएम रुग्णालयात स्त्री शक्तीचा सन्मान

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : नवरात्रौत्सव (Navratri festival) निमित्ताने केईएम रुग्णालयात (KEM hospital) डॉक्टर(doctor), परिचारिका (nurse) यांचा सन्मान म्हणजे सेवाधर्माचा सन्मान करण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्या हस्ते डॉक्टर, परिचारिका या रुग्ण सेवाव्रती नवदुर्गांचा सन्मान (Greetings) करण्यात आला.

हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दीड पट रुग्ण अधिक वाढतील ; तज्ज्ञांचा अंदाज

डॉक्टर, परिचारिका यांचा सन्मान म्हणजे सेवाधर्माचा सन्मान असून केईएम रुग्णालयाचे अधिष्‍ठाता  डॉ. हेमंत देशमुख यांच्या मदतीला डॉक्टर, परिचारिका व इतर सर्व कर्मचाऱ्यांची चांगली टीम असल्यामुळे त्यांनी कोरोना काळात शिवधनुष्य चांगले पेलले असल्याचे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडले. 

महापौर किशोरी पेडणेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते सर्वसाधारण शल्यचिकित्सा शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. शिल्पा राव, क्षयरोग व छातीविषयक व श्वास विभागाच्या विभाग प्रमुख  डॉ. अमिता आठवले, कान-नाक-घसा शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. हेतल मारफातिया, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रियंका प्रसाद, औषधी निर्माणशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. कविता जोशी, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती तृप्ती मथुरे, परीसेविका सर्व श्रीमती सुषमा शिर्के, समिता नाईक, आया श्रीमती वासंती दळवी या  नवदुर्गांचा साडी, शाल, श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: अंधेरी गिल्बर्ट हिलची गावदेवी

महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमी एक वाक्य सांगतात की, देवळातील देव हा मन:शांती देतो परंतु रुग्णालयातील डॉक्टर हा जीवदान देतो.डॉक्टर, परिचारिका यासारख्या पदांवर काम करणे सोपे काम नाही. रक्तामधील डीएनए हाच सेवाभावी वृत्तीचा असावा लागतो, तरच आपण या सेवाभावी नोकरीमध्ये काम करू शकतो.कोरोनाकाळात डॉक्टर, परिचारिका, आया यांनी  रुग्णांची ज्याप्रकारे सेवा केली आहे त्यांच्या या सेवा कार्यातूनच डॉक्टर, परिचारिका या रुग्ण सेवाव्रती  नवदुर्गांचा आज सन्मान करण्यात आला असल्याचे  महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

खासदार अरविंद सावंत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की,  उपस्थित असलेल्या सर्वांनी सेवा धर्म स्वीकारला असून तुमच्या मागण्यांसाठी मी कायम आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक व डॉक्टर यांनी सेवाधर्म स्वीकारला असल्यामुळे त्यांचे वेतन व इतर प्रश्न म्हणजे आपले प्रश्न असे समजून त्यांना मदत करण्यात यावी.

हेही वाचा: Health Tips - भाऊ, व्यायाम शास्त्र समजून घ्या

नगरसेवक सचिन पडवळ यांच्या पुढाकाराने " सन्मान तुमच्या आमच्यातली नवदुर्गाचा"या कार्यक्रमांतर्गत केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, आया या रुग्ण सेवाव्रती नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला.

नगरसेवक सचिन पडवळ हे नेहमी संधीचे सोने करणारे नगरसेवक असून त्यांच्या चांगल्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.  सन्मानित करण्यात आलेल्या नवदुर्गा यांचे महापौरांनी अभिनंदन करून पुढल्या वर्षीसुद्धा या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.

loading image
go to top