Navratri Utsav : मुंबईत आता राजकीय नवरात्र आणि दांडिया उत्सव

मुंबईत आता नवरात्र आणि दांडिया उत्सवाला राजकीय रंग आला आहे. मुंबईतील अधिकाधिक नवरात्रोत्सव मंडळे आपल्याकडे खेचण्याकडे राजकीय पक्षाचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
Navratri Utsav celebrations
Navratri Utsav celebrationssakal

मुंबई - मुंबईत आता नवरात्र आणि दांडिया उत्सवाला राजकीय रंग आला आहे. मुंबईतील अधिकाधिक नवरात्रोत्सव मंडळे आपल्याकडे खेचण्याकडे राजकीय पक्षाचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. राजकीय पक्षांचे बॅनर्स आणि होर्डिंग्स मुंबईत ठिकठिकाणी झळकत आहेत. दांडियात रंगणा-या तरुणाई प्रभावित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. यात भाजपा, शिंदे गट, शिवसेनेसह सर्वच पक्ष आघाडीवर आहेत.

लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, वरळी, दादर, भायखळा या शहर भागातील नवरात्र उत्सवाला आकर्षण असते. सद्या या भागात राजकीय चढाओढ सुरू आहे. भाजपा आणि शिंदे गटाने नवरात्र उत्सव मंडळांना मदत देण्यावर भर दिल्याचे समजते.आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपा शिवसेना शिंदे गट विरूध्द शिवसेना ठाकरे गटात जोरदार राजकीय लढाई सुरू आहे.

मुंबईतील दादर, परळसारख्या मराठी बहुल भागात शिवसेनेचा दबदबा दिसत आहे. जवळपास शंभर जागांवर मराठी मते निर्णायक आहेत. त्यात कोकणी मतांची टक्केवारी महत्त्वाची आहेत. ही मते शिवसेनेची ताकद राहिली आहे.. यावरच आता भाजपाने लक्ष्य केले आहे.

मुंबईत शिवसेनेचा उदय झाला तेव्हापासून शहरातल्या सणांच्या उत्सवांचा संबंध सेनेशी जोडला आहे. अनेक मंडळं, सोसायट्या, तिथले गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव, गरबा यामध्ये पहिल्यापासून सेनेचे वर्चस्व राहिले आहे. येथील शिवसेना ठाकरे गटाच्या वर्चस्वाला आता भाजपा आणि शिंदे गट आव्हान देत आहे.

तीनशेहून अधिक ठिकाणी भाजपाचा दांडिया

भाजपाने जवळपास तीनशेहून अधिक दांडिया गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. गेल्या वर्षीही तीनशे ठिकाणी गरवा उत्सवाचे भाजपाने आयोजन केले होते. त्याला तरूणांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

महत्वाची ठिकाणे

द एकर्स क्लब (क्रिस्टल हॉल), चेंबूर, मुंबई, पोलिस परेड ग्राउंड, घाटकोपर (पूर्व), गोरेगाव क्रीडा संकुल, गोरेगाव (पश्चिम), कोरा केंद्र मैदान, बोरिवली (पश्चिम), पुष्पांजली गार्डन ग्राउंड, बोरिवली (पश्चिम) पश्चिम, बोरिवलीतील चिकूवाडी, दिवंगत प्रमोद महाजन मैदान, ऐश्वर्या राय मजुमदार लिंक रोडजवळील मैदान, किंजल दवेचे बोरिवलीतील कच्छी ग्राऊंड येथे भाजप आमदार सुनील राणे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अंधेरीतील भाजप नेते मुरजी पटेल यांच्या यांच्या पुढाकाराने, मीरा रोड येथे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, नेस्को ग्राऊंड गोरेगाव, मुलंड येथे भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांच्या पुढाकाराने दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com