नौदलाचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

मुंबई - अरबी समुद्रात तैनात असलेल्या नौदलाच्या ताफ्यातील चेतक हेलिकॉप्टर गेल्या आठवड्यात दुर्घटनाग्रस्त झाले. हेलिकॉप्टर बुडण्याआधी तिघेही नौसैनिक बाहेर पडले. युद्धनौकेवरून उड्डाण केल्यावर या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. अशा स्थितीत युद्धनौकेवर परतणे शक्‍य नव्हते. त्यामुळे वैमानिकाने कौशल्याने हेलिकॉप्टर समुद्रावर उतरवले. हेलिकॉप्टर पाण्यात बुडण्यापूर्वी तिघेही नौसैनिक सुखरूप बाहेर आले. बचाव पथकाने त्यांना नौकेवर आणले. या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
Web Title: Navy Helicopter Collapse in Sea