नौदलाच्या युद्धनौका तारागिरीचे दिमाखात लॉचिंग ...

युद्धनौका ऑगस्ट २०२५ रोजी नौदलाकडे सुपूर्द होणार
युद्धनौका
युद्धनौका sakal

मुंबई : शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला बळ देण्याचे काम सुरू आहे. आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टरपासून ते मोठ्या युद्धनौका लष्करात सामील होत आहेत. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत 2 सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. विक्रांतच्या भव्य कमिशनिंगबद्दलचा उत्साह अद्याप संपलेला नाही आणि देश 11 सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाचे स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट 'तारागिरी' लाँच करण्यात आले आहे. लॉन्चिंग माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे पार पडला. व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, वेस्टर्न नेव्हल कमांड या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तारागिरीची जडणघडण

तारागिरी हे नाव गढवालमध्ये असलेल्या हिमालयातील पर्वतावरून पडले आहे. प्रोजेक्ट 17A फ्रिगेट्सचे हे पाचवे जहाज आहे. ही जहाजे P17 फ्रिगेट्स ची अपग्रेड केलेली आवृत्ती असून ती सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, अत्याधुनिक शस्त्रे , सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहेत. तारागिरी ही पूर्वीच्या तारागिरी, लिएंडर वर्गाच्या एएसडब्लू फ्रिगेटची पुनर्रचना आहे. तारागिरी प्रकल्पातील पोलादी कण्याचे (कील) चे काम हे १० सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते.

तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने उदयगिरी आणि सूरत या युद्धनौकांचे लॉंचिंग नुकतेच केले होते. संपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजीने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

तारागिरीची खासियत

ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे. एमडीएलच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशीप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल माईल्सचा वेग गाठणे हे युद्धनौकेला शक्य होणार आहे. यासाठी कार्बन मायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तसेच युद्धनौकेसाठीची शस्त्रे, सेन्सर, एडव्हान्स एक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापरही युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. सरफेस टू सरफेस अशा मिसाईल सिस्टिमचाही वापर युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. गनफायर सपोर्टही युद्धनौकेसाठी देण्यात आला आहे. तसेच रॉकेट लॉंचरचे फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com