esakal | 'माध्यमांसमोर वेळ घालवण्यापेक्षा तपास यंत्रणेला माहिती द्या' | pravin darekar
sakal

बोलून बातमी शोधा

pravin Darekar

'माध्यमांसमोर वेळ घालवण्यापेक्षा तपास यंत्रणेला माहिती द्या'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी आपल्याकडील माहिती केवळ प्रसार माध्यमांसमोर (media) उघड करून वेळ घालविण्यापेक्षा ती महत्त्वाची माहिती संबंधित तपास यंत्रणाकडे (Investigation Agency) द्यावी. जेणेकरून त्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होऊ शकेल, असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी लगावला आहे.

हेही वाचा: Mumbai : साकिनाका येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

ड्रग्ज प्रकरणात क्रूझवरील कारवाईमध्ये सुरुवातीला दहा लोकांना पकडले होते; मात्र दोन लोकांना सोडण्यात आले. त्यामध्ये एकजण भाजपच्या नेत्याचा मेहुणा असल्याची सविस्तर माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देणार असल्याचे नवाब मलिक यांनी आज जाहीर केले. त्यावर दरेकर यांनी मलिक यांच्या वक्तव्यामध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच, मलिक यांच्या दाव्यानुसार पकडण्यात आलेल्यांमध्ये कोणी नेत्याचा नातेवाईक असेल; तर त्यावरही एनसीबी नक्कीच कारवाई करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

loading image
go to top