नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब; NCB पुन्हा रडारवर | Nawab Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik
नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब; NCB पुन्हा रडारवर

नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब; NCB पुन्हा रडारवर

एनसीबीचा (NCB) फर्जीवाडा थांबायचं नाव घेत नाहीये असं म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. फर्जीवाडा करून लोकांवर खोटे आरोप लावले, लोकांना अडकवण्यात आलं असं म्हणत नवाब मलिक यांनी आज एक ऑडिओ क्लीप समोर ठेवली आहे. यामध्ये दोन व्यक्ती एका प्रकरणावर बोलत असल्याचं समजतंय. त्यानुसार या प्रकरणात कशा पद्धतीनं खोटे पंच उभे करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकांनी (Nawab Malik) केला आहे. (Nawab Malik Share New Audio Clip)

हेही वाचा: पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; काळजी घेण्याचे केले आवाहन

पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी सादर केलेल्या दोन वेगवेळ्या ऑडिओ क्लिपमध्ये एक किरण बाबू नावाचा अधिकारी आणि दुसऱ्यांदा समीर वानखेडे एका मॅडी नावाच्या व्यक्तीला पंच बनण्यासाठी बोलत असल्याचं दिसतंय. कार्यालयात येणं अडचणी ठरेल म्हणून बाहेर भेटण्यास सांगत आहेत. समीर वानखेडेंना जेव्हा तो मॅडी नावाचा पंच विचारतो की, 'या प्रकरणात आधीच एवढ्या अडचणी सुरू आहे. काही होणार तर नाही ना?' तेव्हा समीर वानखेडे म्हणतात की बिनधास्त जाऊन भेट असं या ऑडिओ क्लिपमधून समोर येत असल्याचं नवाब मलिक म्हणाले. एनसीबीने या प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा आरोप करत त्यांनी NCB फर्जीवाड्याची मर्यादा ओलांडत असल्याचं नवाब मलिक म्हणाले. के.पी. गोसावी, भानूशाली, बोगस कागदांवर सही घेणे हे सर्व फर्जीवाडे समोर आणल्यावर एनसीबीने चौकशी समिती स्थापन केली मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नसल्याचं दिसतंय.

हेही वाचा: SulliDeals & BulliBai वरून मुस्लीम महिला टार्गेट, शिवसेना आक्रमक

एनसीबीने या प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा आरोप करत त्यांनी NCB फर्जीवाड्याची मर्यादा ओलांडत असल्या आरोप केला. नवाब मलिक म्हणाले. के.पी. गोसावी, भानूशाली, बोगस कागदांवर सही घेणे, खोटे पंच तयार करणे हे सर्व फर्जीवाडे समोर आणल्यावर एनसीबीने चौकशी समिती स्थापन केली मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नसल्याचं दिसतंय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :nawab malik
loading image
go to top