esakal | मलिक यांच्या जावयाच्या अटकेमुळेच तपास यंत्रणांवर आरोपांची फैरी- प्रवीण दरेकर | Pravin darekar
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin-Darekar

मलिक यांच्या जावयाच्या अटकेमुळेच तपास यंत्रणांवर आरोपांची फैरी- प्रवीण दरेकर

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : नबाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाला (son-in-law) अटक झाल्यावर त्यांच्या समाजात झालेल्या बदनामीमुळे ते सूडभावनेतून तपासयंत्रणांविरुद्ध (NCB) वक्तव्ये करीत असल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी आज येथे केली.

हेही वाचा: भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा

एनसीबीने आर्यन खान प्रकरणी केलेली कारवाई चुकीची आहे, ते अमली पदार्थ नव्हते. तसेच एनसीबीकडून चुकीच्या पद्धतीने आपल्या जावयावर कारवाई होत आहे, असा आरोप मलिक यांनी केला. त्याबाबत दरेकर यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले. मलिक यांचे आरोप म्हणजे न्यायव्यवस्थेवर टीका करण्यासारखे आहे. हा न्यायव्यवस्थेचे मनोबल खच्ची करण्याचा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.

एनसीबीने केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा मलिक जहिरपणे करीत आहेत, हे अभूतपूर्व आहे. कारण जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर अश्या प्रकारचे भाष्य करणे चुकीचे असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले. यासंदर्भात चौकशीसाठी आयोग नेमण्याची मागणी ते पत्रकारांसमोर का करतात हे आपल्या आकलनापलिकडचे आहे. त्यांनी आपल्याच राज्य सरकारमार्फत केंद्राकडे तशी मागणी करावी, त्यानुसार केंद्र सरकार आवश्यक उपाययोजना करेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: मुंबईतील 3 हजार 493 भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण

मलिक यांच्या जावयाला आठ दिवस तुरुंगात रहावे लागले आहे. जर एनसीबी योग्य प्रकारे काम करते असे म्हटले तर मलिक यांच्या जावयाची अटक योग्य होती, हे निश्चित होते. त्यामुळे भविष्यात आपल्या जावयाला वेगवेगळ्या कारवायांना सामोरे जावे लागेल ही भीती त्यांना आहे. त्यापोटी मलिक तपास यंत्रणावर खोटे आरोप करून त्यांना कोंडीत पकडायचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही दरेकर यांनी केला.

अंमली पदार्थ तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहेत. आपण अंमली पदार्थ तस्करी करणा-यांच्या बाजूने उभे राहायचे की अमली पदार्थांची तक्रार करणाऱ्यांच्या विरोधात बोलायचे, यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. संबंधित संशयित न्यायव्यवस्थेकडे न्याय मागतीलच. परंतु लोकप्रतिनिधींनी न्यायव्यवस्थेवर तसेच तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवायचा हे खेदजनक असल्याचेही दरेकर म्हणाले.

loading image
go to top