कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला गांजा पुरवणाऱ्या पेडलरच्या NCB ने आवळल्या मुसक्या

अनिश पाटील
Thursday, 26 November 2020

 बॉलीवूडमधील ड्रग्स वितरणाप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) एका ड्रग्स वितरकाला अटक केली आहे.

मुंबई, ता. 26  :  बॉलीवूडमधील ड्रग्स वितरणाप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) एका ड्रग्स वितरकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा ड्रग्स पेडलर कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला गांजा पुरवठा करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

NCB च्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अटकेतील ड्रग पेडलरची कसून चौकशी सुरू आहे.  चौकशीमधून छोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता आहे. यामधील बॉलीवूड कनेक्शनही तपासण्यात येत आहे.

महत्त्वाची बातमी : वेश्याव्यवसायातील महिलांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय, मिळणार 5 हजारांची मदत

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स पेडलरकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ड्रग पेडलर हा प्रत्येक सप्लिमेंटमधील ड्रग्स सप्लाय करतो. तसेच तो पेटीएम, गूगल पे यांसारख्या माध्यमातून पेमेंट घेतो. त्यामुळे आता त्याचे बँक अकॉउंट ट्रान्झेक्शन देखील तपासण्यात येत आहे.

दुसरीकडे एनसीबीच्या पथकाने नवाब शेख आणि फारुख चौधरी अशा दोन 2 ड्रग्स पॅडलर्ससा अटक केली आहे. दोघांकडून 32.9 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि एलएसडीच्या 10 बॉट्स जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे नवाब शेख हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. तो मुंबईत टॅक्सी चालवतो. मुंबई सेंट्रलमधील एका आलीशान अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे.

एनसीबी सूत्रांनुसार, कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा नवाब शेख टॅक्सी चालवून हा गैरप्रकार करत होता. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवत होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री उशीरा त्या घरावर छापा टाकला. तर फारुख चौधरी हा एमडी कन्साइनमेंट डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. त्यालाही अटक करण्यात आली. दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. 

महत्त्वाची बातमी : कोकणातील माशांच्या नव्या प्रजातीचा BNHS कडून शोध

NCB arrested peddler who was providing illegal powder to bharati and her husband 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB arrested peddler who was providing illegal powder to bharati and her husband