NCB येत्या काळात करू शकते मोठे खुलासे, आणखी कुणाला धाडले जाणार समन्स?

सुमित बागुल
Monday, 28 September 2020

ड्रग्स अँगलमध्ये आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चार्जशीट दाखल करणार आहे. यामध्ये अनेक मोठ्या अभिनेत्र्या आणि अभिनेत्यांसह बॉलिवूडमधील बडे सेलेब्रिटी NCB च्या रडारवर आहेत.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु आहे. यामधील ड्रग्स अँगलबाबत सखोल चौकशी केली जातेय. ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि रियाचा भाऊ शोविक आणि त्यांचे अन्य साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत. अशात नुकतीच बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्र्यांची NCB कडून चौकशी केली गेली. यामध्ये दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी केली गेली.  

त्यानंतर NCB च्या कारवाईला आता आणखी वेग आलाय. नुकतेच NCB प्रमुख राकेश मुंबईत दाखल झालेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर राकेश अस्थाना यांनी तातडीची महत्त्वाची बैठक बोलावली. मिळलेल्या माहितीनुसार ही बैठक तब्बल पाचतास सुरु होती. 

महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

बडे अभिनेते अभिनेत्र्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) च्या रडारवर : 

ड्रग्स अँगलमध्ये आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चार्जशीट दाखल करणार आहे. यामध्ये अनेक मोठ्या अभिनेत्र्या आणि अभिनेत्यांसह बॉलिवूडमधील बडे सेलेब्रिटी NCB च्या रडारवर आहेत. काहींची आता चौकशी सुरु आहे. मात्र यामध्ये आता आणखी काही नावं समोर येणार असल्याचं बोललं जातंय, सोबतच बडे खुलासे देखील होऊ शकतात. मिळलेल्या माहितीनुसार, NCB प्रमुख राकेश अस्थाना यांनी ड्रग्स प्रकरणी सहा चार्जशीट दाखल करण्यास सांगितलं आहे. 

दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची शनिवारी NCB मार्फत चौकशी झाली. दरम्यान चौकशीत तिघीनींही उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरं दिलीत अशीही माहिती समोर येतेय. तिघींचाही मोबाईल NCB ने जप्त केल्याचीही माहिती आहे.   

NCB chief rakesh asthana in mumbai took five hours long meeting with officers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB chief rakesh asthana in mumbai took five hours long meeting with officers