esakal | रियाच्या अडचणीत वाढ; जामिनाविरोधात NCB सर्वोच्च न्यायालयात
sakal

बोलून बातमी शोधा

रियाच्या अडचणीत वाढ; जामिनाविरोधात NCB सर्वोच्च न्यायालयात

सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे.

रियाच्या अडचणीत वाढ; जामिनाविरोधात NCB सर्वोच्च न्यायालयात

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री आणि सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे.

रियाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना पारफ न्यायालयात जमा करण्याचे आणि चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तिने सुशांतसाठी अंमलीपदार्थ घेतल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला होता. रियाचा भाऊ शौविकचा जामीन नामंजूर झाला होता.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एनसीबीने केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे 18 मार्चला सुनावणी होणार आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी गळफास लावलेल्या स्थितीत आढळला होता.

रियाच्या विरोधात सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये तक्रार केली आहे. सीबीआय या प्रकरणाची तपास करत असून एनसीबीने देखील अनेकांना अटक केली होती. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलविले होते.

हेही वाचा- म्हणून बनावट नंबर प्लेट प्रकरणी CIU अधिकाऱ्यांची होतेय चौकशी

सुशांत सिंह प्रकरणात NCBचं आरोपपत्र 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीनं 5 मार्चला चार्जशीट दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये 33 जणांचा समावेश आहे. मुंबई सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. एनसीबीच्या वतीनं 30 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण 33 जण आरोपींची नावे आहेत.  तीस हजार पानांच्या आरोपपत्रात 12 हजार पानांची हार्ड कॉफी आणि सीडीमधील पुरावे यांचा समावेश आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

NCB filed appeal Supreme Court against decision grant bail Rhea Chakraborty

loading image