WhatsApp मधील ड्रग्स चॅट संदर्भात दीपिकाने दिली कबुली, सेवनाबाबत मात्र नकार - सूत्र

WhatsApp मधील ड्रग्स चॅट संदर्भात दीपिकाने दिली कबुली, सेवनाबाबत मात्र नकार - सूत्र

मुंबई : आज सकाळीच NCB कार्यालयात दीपिकाची चौकशी सुरु झालीये. सकाळी दहा वाजता दीपिकाची चौकशी सुरु झाली. दीपिका आणि करिश्मा (दीपिकाची मॅनेजर) यांच्यात ड्रग्स बाबत WhatsApp वरील चॅटवरून त्यांची चौकशी करण्यात येतेय. केपीएस मल्होत्रा आणि आणखी चार जणांच्या टीमकडून दीपिकाची चौकशी करण्यात येतेय. या चौकशीच्या सुरवातीला दीपिकाला सहकार्य करण्यास सांगण्यात आलं. तुम्ही चौकशीत सहकार्य केलं तर ते सर्वांसाठी योग्य ठरेल. सोबतच पुढेही गरज पडल्यास दीपिकाला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल हेही सांगण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीमप्रमाणे त्यासाठीही दीपिकाने होकार दिला. यामध्ये दिपीकासमोर NCB कडे काय काय पुरावे आहेत ही माहिती ठेवण्यात आली आणि त्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यास सुरवात झाली. दरम्यान, चौकशीवेळी दीपिकाचा फोन काढून घेतल्याचं समजतंय. चौकशीवेळी तुम्हाला कुणाशीही बोलण्याची अनुमती नसेल, सुरवातीला तुम्हाला कुणाशी बोलायचं असल्यास फोन करावा असं दीपिकाला NCB कडून सांगण्यात आलं.  मात्र दीपिकाने कुणालाही फोन करण्यात आला नाही.  

दीपिकाचा जबाब नोंदवल्यानंतर दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि दीपिकाची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांच्यासमोर WhatsApp चॅट ठेवण्यात आलेत. दीपिकाने काही उडवाउडवीची उत्तरं दिलीत असंही टीव्ही माध्यमांमधून समोर आलं.

त्यानंतर आता ड्रग्स चॅट संदर्भात दीपिकाने कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येतेय. मात्र स्वतः तिनी कुणाहीकडून ड्रग्स घेतलेले नाहीत किंवा त्याचं सेवन देखील केलेलं नाही असंही दीपिका म्हणाली आहे. दरम्यान, ड्रग्सच्या बाबतीत दीपिकाने समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत असंही सूत्रांकडून समजतंय.  

NCB interrogation deepika padukon accepts about chats made on whats app were her

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com