मुंबईत NCB ची मोठी कारवाई; आग्रीपाडा, बदलापूरातून ड्रग्ज आणि रोकड जप्त

या धडक कारवाईमुळं ड्रग्ज माफियांचं धाब दणाणलं आहे.
NCB
NCBFile Photo

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (NCB) मुंबईतील डोंगरी परिसरात छापेमारी केली. यावेळी एनसीबीच्या पथकाने मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केली. या धडक कारवाईमुळं ड्रग्ज माफियांचं धाब दणाणलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग अँगलनंतर एनसीबीनं कारवाईचा वेग वाढवला आहे.

NCB
"भारत जागा हो! कोरोना लाटेची स्थिती युद्धासारखी"; माजी लष्करप्रमुखांची कळकळीची विनंती

डोंगरी भागातील सरफराज कुरेशी नामक व्यक्तीच्या घरी एनसीबीच्या पथकानं झाडाझडती घेतली. यावेळी कुरेशीच्या घरात 2 लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम ड्रग्ज तस्करीतली असल्याचं चौकशीत समोर आलं आहे.

NCB
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग; डाग्नोस्टिक सेंटर्सचं निरीक्षण

सरफराजच्या चौकशीतून त्याला MD ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर सुलेमान शर्मा या ड्रग्ज तस्कराचं नाव समोर आलं. समीरच्या घराच्या झडतीत 54 ग्रँम MD ड्रग आणि ड्रग्ज तस्करीतून जमा झालेले 17 लाख 90 हजार रोख आढळून आले. त्यात काही परदेशी चलन आणि चाकूचाही समावेश आहे. कारवाईवेळी समीर घरी नसल्याने त्याचा शोध सुरु आहे.

NCB
देशात युद्धपातळीवर रेमडेसिव्हीरचं उत्पादन सुरु; दररोज तयार होणार ३ लाख डोस

याच प्रकरणात बदलापूर येथून ड्रग्ज तस्करी होत असल्याचं समोर आलं. त्यानुसार NCB ने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतलं. समीर परदेशी आणि अजय नायर अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या घरझडतीत NCB ला 43 किलो गांजा आढळून आला. या दोघांनी हा गांजा कुणाल कडू नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला होता. हे ड्रग्ज ओडिशाहून महाराष्ट्रात आणल्याचं तपासात समोर आलं असून त्या अनुषंगानं NCB तपास करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com