

Mumbai Cocaine Seizure
ESakal
मुंबई : केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कळंबोली, भिवंडी येथून तब्बल ३४९ किलो कोकेन साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या कोकेन साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारात १,७४५ कोटी इतकी किंमत आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे, असा दावा एनसीबीच्या प्रवक्त्याने केला.