'मातोश्री'बाहेर "राष्ट्रवादी'चे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ आज "मातोश्री'बाहेर मुंबई राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुंबई राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि "मुंबई युवती'च्या अध्यक्षा अदिती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शरद पवार हे देशाचे नेते असून, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.
Web Title: NCp Agitation to Matoshri Politics