राष्ट्रवादीकडून नेहमीच सर्वसामान्यांचा विचार : रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

आम्ही नेहमीच सर्वसामान्य लोकांचा विचार करत आलो आहेत. पवारांनी याचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे, असे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सांगितले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पोलिसांचा दबाव असू शकत नाही आणि राष्ट्रवादीची भूमिका बदलली नाही. पोलिस आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त येऊन सांगत असतील तर मुंबईकरांना अडचण होऊ शकते. आम्ही नेहमीच सर्वसामान्य लोकांचा विचार करत आलो आहेत. पवारांनी याचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे, असे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सांगितले.

...म्हणून ईडी कार्यालयात जाणार नाही : शरद पवार

महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह 71 नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येत आहे. पवार यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. याविषयी रोहित पवार यांनी मत व्यक्त केले.

‘ईडीने झोपलेल्या राष्ट्रवादीला जागं केलं’

पवार म्हणाले, की राष्ट्रवादी असा स्टंट कधी करत नाही. पवारसाहेबांना 50 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असताना ते असे कधी करणार नाहीत. याठिकाणी लोक पवारांच्या प्रेमासाठी येत आहेत. पवारसाहेब कधी सहानुभूती घेत नाहीत. आम्ही जे काही मनापासून करतो. आमचे नाव कशासाठी येते हा आम्हाला अधिकार आहे. पोलिसांमुळे पवारसाहेबांनी हा निर्णय घेतला. लोकांना आता कळून चुकले आहे, की सरकारकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP always thinks about common man says Rohit Pawar