खातेवाटप आणि अब्दुल सत्तार यांच्या नाराजीवर जयंत पाटील म्हणतात..

खातेवाटप आणि अब्दुल सत्तार यांच्या नाराजीवर जयंत पाटील म्हणतात..

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापनतर झालंय. मात्र महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाहीये का असा प्रश्न उपस्थित करायला वाव मिळतोय. मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबर रोजी झालाय. मात्र अद्याप खातेवाटप झालेलं नाही.खातेवाटपाची सर्व चर्चा झालेली आहे, असं महाविकास आघाडीकडून वारंवार सांगण्यात येतंय. तरीही खातेवाटप काही अद्याप जाहीर झालेला नाही. 

महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षात काही नेत्यांकडून मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराजीचा सूर उमटताना दिसला. शिवसेनेचे सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत होते. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांची नाराजी समोर आली. इकडे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याची भूमिका घेतलेली. तर काँग्रेस आमदारांच्या समर्थकांनी तर पुण्यात काँग्रेसचं ऑफिस तोडलं. 

यानंतर मोठी बातमी आज समोर आली. बातमी आहे नाराज अब्दुल सत्तार यांची. अब्दुल सत्तार नाराज आहेत. सत्तार यांना कॅबिनेटमंत्री न बनावट राज्यमंत्रिपद दिल्याने ते नाराज असल्याचं समोर आलंय. या सर्व गोंधळात विरोधकांनी देखील सर्व प्रकारावर चांगलाच निशाणा साधलाय. 

या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी खातेवाटप आणि अब्दुल सत्तार यांच्या नाराजीवर भाष्य केलंय. खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घोषणा करणार आहेत. खातेवाटपातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री त्यांच्या सोईनुसार खातेवाटप करणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. 

अब्दुल सत्तार यांच्या नाराजीवर देखील जयंत पाटील यांनी भाष्य केलंय. अब्दुल सत्तार नाराज नाहीत, त्यांच्या नाराजीचे काही कारण नाही . मात्र याबाबत मला काही माहिती नाही असं  जयंत पाटील म्हणालेत.  दरम्यान खातेवाटपाबाबत असणाऱ्या सर्व अडचणी काळ संध्याकाळी दूर झाल्याचं देखील ते म्हणालेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाकला नाराज राहण्याचं कारण नसल्याचं जयंत पाटील म्हणालेत. गृह खाते इतर खात्यांचा वाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तसं मुख्यमंत्री वाटप करतील. 

महाराष्ट्रातील राजकारणात गेले काही दिवस वारंवार मोठ्या घडामोडी घडतायत. अशात सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष होऊ नये अशी सर्वसामान्यांची आशा आहे. 

ncp cabinet minister jayant patil on roles and duties to the minister and abdul sattar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com