esakal | शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार

निवडणूक आयोगाच्या विनंतीवरून आयकर विभागाने शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणुकांवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे.

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची तपासणी करण्यास निवडणूक आयोगाने  प्रत्यक्ष कर विभागाला विनंती केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आलीये. स्वतः शरद पवार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि यावर शरद पवार पवारांनी आपलं मत मांडलं आहे. "आमच्यासारख्या काही लोकांवर त्यांचं विशेष प्रेम आहे", शरद पवार याबाबत बोलताना म्हणालेत. खरंतर नोटीस येणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र संपूर्ण संसदेत आम्हीच काही लोकं का निवडले जात आहोत, याबाबत विचार करायला हवा. हातामध्ये नोटिशीचा कागद आला की नेमकं काय ते समजेल, असंही शरद पवार म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी - मुंबईत कोव्हिडची स्थिती चिंताजनक; तब्बल 33 लाख लोकं कंटेंन्मेंट झोनमध्ये; सहा महिन्यानंतर आकड्यांमध्ये घट नाही

काय आहे प्रकरण ? 

निवडणूक आयोगाच्या विनंतीवरून आयकर विभागाने शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणुकांवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. आयकर विभागाने शरद पवारांकडून काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण मागवलं आहे. 

सुप्रिया सुळेयांनाही येणार नोटीस ? 

स्वतः शरद पवारांनी याबाबत बोलताना सखासदार सुप्रिया सुळे यांनाही नोटीस येणार आहे असं समजलं असल्याचं सांगितलं. यावेळी पवारांनी टोला देखील लगावला. संपूर्ण देशात आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम असल्याचा टोला पवारांनी लगावला. 

महत्त्वाची बातमी -  कृषी सुधारणा विधेयकावरून महाविकास आघाडीत ठिणगी; शिवसेना - राष्ट्रवादीच्या भूमिकेवर कॉंग्रेसचा आक्षेप

आज दिवसभर अन्नत्याग करणार

शरद पवारांनी अभूतपूर्व गदारोळात नुकत्याच पास झालेल्या कृषी विधेयकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपणही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असल्याचं शरद पवार म्हणालेत. सोबतच राज्यसभेत गोंधळ घातल्यामुले आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या आठ खासदारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. त्यांना अनुमोदन म्हणून आज दिवसभर शरद पवार यांनीही अन्नत्याग केला आहे. 

NCP chief sharad pawar gets income tax notice with reference to his affidavits submitted to EC