मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचे पत्र, म्हणाले...

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना काहीच दिवसांपूर्वी रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
Sharad-Pawar-Uddhav-Thackeray-Letter
Sharad-Pawar-Uddhav-Thackeray-LetterE-Sakal

मुंबई: आदरातिथ्य क्षेत्रातील (Hospitality) व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सहानुभूतीपूर्वक विचार करतील. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या (Coronavirus) या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात (Letter) व्यक्त केला. कोरोनाच्या जागतिक संकटात दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची (corona chain) साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा (Curfew) निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे, असेही शरद पवार यांनी पत्रात नमूद केले. (NCP Chief Sharad Pawar Writes Letter to CM Uddhav Thackeray)

कोरोना पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत शरद पवार यांची भेट घेतली आणि आपल्या समस्या मांडल्या. त्यांनी शरद पवार यांनी व्यावसायिकांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काही दिवसांपूर्वीच ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दैनंदिन वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान पवार यांच्या तोंडात लहान अल्सर सापडल्यानंतर तो अल्सर काढण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी दिली. शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच काही काळ विश्रांची घेणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, काही काळ घरी विश्रांती घेतल्यानंतर पवार यांनी आज घराबाहेर पडत कारमधून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

Sharad-Pawar-Uddhav-Thackeray-Letter
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com