राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला लाच स्वीकारताना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

ठाणे - मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 31 मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनीता सातपुते (वय 53) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी लाच स्वीकारताना पकडले. इमारत दुरुस्तीचे बांधकाम सुरू ठेवण्यासाठी तिने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना अटक केली. मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात एका इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामाविरोधात स्थानिक रहिवाशांनी ठाणे महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सुनीता सातपुते यांनी बांधकाम सुरू ठेवण्यासाठी 50 हजारांची मागणी केली होती.
Web Title: ncp corporator arrested in bribe case