ठाण्यात ‘गरजे’ चे राजकारण तापले

महासभा सुरु असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते
Thane Municipal corporation
Thane Municipal corporationsakaal
Updated on

ठाणे - राज्याच्या सत्ताकारणात शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी (NCP) एकत्र नांदत असली तरी ठाण्यात (Thane) दोन्ही पक्षाच्या (Partys) एकोप्यात मिठाचा खडा पडला आहे. निमित्त ठरले ते मंगळवारी (Tuseday) ऑनलाईन (Online) महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी (corporeter) केलेल्या ऑफलाईन (Offline) राड्याचे. यावेळी गोंधळ घालणाNया राष्ट्रवादीची (NCP) आम्हाला गरज नाही, आमची महापालिकेत एकहाती सत्ता आहे असे विधान महापौर नरेश म्हस्के यांनी केले होते. त्याला आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उत्तर देत ‘तुम्ही राष्ट्रवादीच्याच पाठींब्यामुळे बिनविरोध महापौर झालात’ याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे ठाण्यात (Thane) विकासकामांच्या दुजाभावमुळे सुरू झालेले राजकारण ‘गरजे’च्या कलगीतुNयामुळे तापले आहे.

मंगळवारी महासभा सुरु असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी आपणाला राष्ट्रवादीची गरज नाही, असे विधान केले होते. त्यानंतर सावरासावर करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या पत्राचा हवाला देत पालिका आयुक्तांना विकासकामांची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर असले तरी शिवसेनेसोबतची मैत्री ताणली जाणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र महापौरांचे ते विधान राष्ट्रवादीच्या चांगलेच जिव्हारी लागल्याने या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Thane Municipal corporation
वातावरण बदलाचा "गावरान मेवा'वरही परिणाम ! बहार आला कमी 

२०१९ साली ठाणे महापौरपदाची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना फोन करुन शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केली होती. ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे; त्यामुळे ठाण्यातही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध करावी’, अशी विनंती झाल्याने राष्ट्रवादीने मोठ्या दिलाने निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला महापौरपद बिनविरोध पद्धतीने दिले. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१९ रोजी नरेश म्हस्के हे महापौर झाले. या घटनेची यानिमित्ताने आनंद परांजपे यांनी म्हस्के यांना आठवण करून दिली.

Thane Municipal corporation
'पालघर'मध्ये 2 डेल्टा रुग्ण ठणठणीत! धोका वाढण्याची शक्यता..

सक्षम विरोधी पक्ष म्हणून आवाज अठवणारच

राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करीत असतानाही राष्ट्रवादीने ठाण्यात सत्ताधा? यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. याचे समर्थन करत ठामपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या राजवटीत जी काही अनागोंदी चालली आहे. त्याची पोलखोल महासभा आणि ठाणेकरांसमोर करावी लागणारच आहे. कोविडच्या काळात पालिका प्रशासनाकडून अनागोंदी कारभार सुरू असून शासन म्हणून शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नव्हता. सत्ताधारी शिवसेना दुटप्पी भावनेने वागत आहे; लसीकरण, विकासनिधीमध्ये सेनेकडून राजकारण केले जात आहे. याचा आक्रोश कधी ना कधी होणारच होता. आणि यापुढेही आवाज उठवणारच असा टोलाही परांजपे यांनी लावला आहे.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com