Loksabha 2019 : अजित पवार यांचा सेना-भाजपच्या नेत्यांना फोन; मावळमध्ये फोडाफोडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

मावळ मतदारसंघामध्ये सध्या याचीच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मतदारसंघात अजित पवार यांच्या फोनची चर्चा मतदारसंघात रंगत आहेत. मावळ मतदारसंघात बारणे विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. राजकीय ताकद हि युतीची असल्याने पार्थ पवार यांना निवडणूक सोपी नाही. त्यामुळे पवार परिवारला हि निवडणूक महत्त्वाची आहे.

पनवेल : मावळ मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सध्या कर्जत, उरण, पनवेल या परिसरातील सेनेचे भाजपचे नेत्यांना फोन करून पार्थला मदत करा असे सांगत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना आपल्या मदत केली आहे. आता आपण पार्थ मदत केली पाहिजे, आपल्यासोबत विविध विषयांवर चर्चा करतात येईल, असे फोन वरून सांगत आहे. त्यामुळे युतीचे नेते सध्या आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मावळ मतदारसंघामध्ये सध्या याचीच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मतदारसंघात अजित पवार यांच्या फोनची चर्चा मतदारसंघात रंगत आहेत. मावळ मतदारसंघात बारणे विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. राजकीय ताकद हि युतीची असल्याने पार्थ पवार यांना निवडणूक सोपी नाही. त्यामुळे पवार परिवारला हि निवडणूक महत्त्वाची आहे. पवार परिवारातील अनेक नेते वेगळ्या भागात तळ ठोकून आहेत. त्यामुळे हि निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

तिसरा टप्पात रायगड मतदारसंघाचे मतदान होत आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघाची सूत्रे सुनील तटकरे आणि शेकापचे नेते जयंत पाटील हे घेणार आहेत. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यामध्ये अजित पवार, आमदार सुरेश लाड, सुनील तटकरे, जयंत पाटील, प्रमोद हिंदुराव यांनी सेनेच्या भाजपाच्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ ठरवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मतांचे योग्य नियोजन केले आहे. सेना आणि भाजप नेते कोणाला मदत करतात यांवरच मावळ मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल. 

Web Title: NCP leader Ajit Pawar campaign for Parth Pawar in Maval Loksabha constituency