esakal | कर्जमाफी लवकरचं होणार..! अजित पवार यांची ग्वाही  
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जमाफी लवकरचं होणार..! अजित पवार यांची ग्वाही  
  • शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा

कर्जमाफी लवकरचं होणार..! अजित पवार यांची ग्वाही  

sakal_logo
By
संजय मिस्कीन

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणारच आहे. कर्जमाफी कशा पद्धतीने करावी या यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झालेली असून कर्जमाफीची घोषणा लवकरच करण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज दिली.  सुयोग या पत्रकारांच्या निवासस्थानी आज सकाळी अनोपचारिक चर्चेत अजित पवार बोलत होते. 

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या संदर्भात हे सरकार गंभीर आहे. कर्जमाफी कशा पद्धतीने द्यावी यावर सविस्तर माहिती घेतली जात असून त्याबाबतचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. 

महत्त्वाची बातमी :  मुंबईतील रेल्वे स्थानकात घुसले विषारी साप आणि...

महाविकास आघाडी सरकारने दिलेली कर्जमाफी फडवणीस सरकारच्या नुसार तीन वर्षे राहणार नसून केवळ तीन महिन्यात सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल याबाबत आराखडा आखला गेल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

मध्य प्रदेश व राजस्थान सरकारने शेतकरी कर्जमाफी केली आहे त्यांनी केलेल्या कर्जमाफीचा आढावा देखील घेतला जात असून महाराष्ट्रात ही त्याच प्रकारे कर्जमाफीची योजना राबवली जाईल अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. 

महत्त्वाची बातमी :  नवीन वर्षी असं बदलेल तुमचं आमचं WhatsApp..

दरम्यान , यावेळी बोलताना अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक तरुण आमदार पहिल्यांदाच आलेल्या असल्याने पुढील राजकीय कारभार तरुणांच्या हातात जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 

आदित्य ठाकरे नम्रतेने सर्वांसोबत संवाद साधतात. एका मोठ्या राजकीय घरण्यातील असतानाही सर्वां सोबतच आदित्य नम्रपणे व मवाळ अपने संवाद करतात याबाबत अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले. याशिवाय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख आणि आणि रोहित पवार या या युवा आमदारांचे ही अजित पवार यांनी कौतुक केले. 

हे वाचलं का नाही ? :  लोकांना ढगात पाठवणारा गांजा जातोय अंतराळ यात्रेला

आदित्य नम्र आणि अत्यंत मनमिळावू तरुण आमदार असून धीरज यांच्यामध्ये हुबेहूब विलासराव देशमुख यांची छाप असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.  
 

Webtitle : NCP leader ajit pawar on maharashtra farmers loan wavier