esakal | मुंबईतील रेल्वे स्थानकात घुसले विषारी साप आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील रेल्वे स्थानकात घुसले विषारी साप आणि...

मुंबईतील रेल्वे स्थानकात घुसले विषारी साप आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वाट चुकून तुर्भे रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळामध्ये आलेल्या 2 विषारी सापांना सर्प मित्रांच्या मदतीने पकडून त्यांना जीवदान देण्याचे कार्य तुर्भे आरपीएफच्या जवानांनी केले. गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता या सापाना पकडताना पहाण्यासाठी प्रवाशांनी तुर्भे रेल्वे स्थानकावर एकच गर्दी केली होती.

गुरुवारी सायंकाळी घोणस जातीचे 2 साप वाट चुकून तुर्भे रेल्वे स्थानकातील कोपरखैरणे बाजूकडील फलाट क्र.1 व 2 मधील रेल्वे रुळामध्ये आले होते.हे सर्प काही प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.त्यामुळे सदर साप एखाद्या प्रवाशाला चावण्याची शक्यता होती.

महत्त्वाची बातमी :  लोकांना ढगात पाठवणारा गांजा जातोय अंतराळ यात्रेला

या सापाची माहिती मिळताच तुर्भे अरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक पी.के. विश्वकर्मा यांनी सहाययक पोलीस उपनिरीक्षक वरेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी झालेली प्रवाशांची गर्दी बाजूला करून तात्काळ सर्प मित्रांना बोलावून घेतले. 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबई शहरातून 'का' होतायत मोलकरणी गायब ?

काही वेळातच त्याठिकाणी आलेल्या सर्पमित्र सुहास शिंदे, अजय साळुंखे आणि अर्जुन राठोड या तिघांनी रेल्वे रूळालागतं लाकडी स्लीपरच्याखाली दडून बसलेल्या दोन्ही सापांना पकडले. साप पकडण्याची ही कसरत सुमारे अर्धा तास सुरू होती. त्यामुळे बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. सर्प मित्रांनी पकडलेले दोन्ही साप घोणस या विषारी जातीचे असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पकडलेले दोन्ही साप जंगलात नेऊन सोडले. सुदैवाने सदर ठिकाणी कोणतीही दुर्घटना झाली नाही,तसेच लोकलसेवेचा देखील खोळंबा झाला नसल्याचे तुर्भे अरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक पी.के.विश्वकर्मा यांनी सांगितले.  

WebTitle : poisonous snakes found on turbhe railway station

loading image