राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांना खंडणीप्रकरणी अटक ; शैक्षणिक संस्थेकडे पाच लाखांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नालासोपारा : माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली आणि त्यानंतर त्या आधारे शाळेचा एफएसआय विकल्याचे कारण सांगून संबंधित संस्थेकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्ष गोविंदा गुंजाळकर, तसेच मनसेचे कार्यकर्ते संजय कदम यांच्यावर नालासोपारा पोलिस ठाण्यात नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुंजाळकर यांना आज शनिवारी (ता. 31) मध्यरात्री 3 वाजता त्यांच्या राहत्या घरातून अटकही करण्यात आली आहे; तर संजय कदम फरारी आहेत. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व संस्थाचालक शिरीष चव्हाण यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती. 

नालासोपारा-पूर्वेला सर्वेक्षण क्र. 17, हिस्सा क्र. 2 व 3 या ठिकाणी शिरीष चव्हाण यांची छत्रपती शिक्षण संस्था संचालित राजे शिवाजी विद्यालय ही शाळा आहे. या शाळेच्या एफएसआयची माहिती मनसेचे कार्यकर्ते संजय कदम यांनी माहितीच्या अधिकारात काढली होती. मिळालेल्या माहितीनुसार शाळेचा एफएसआय शाळेने इतर इमारतीसाठी वापरून, त्यात लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचे कदम यांचे म्हणणे होते. या बाबीची कुठेही तक्रार करू नये यासाठी कदम यांनी प्रथम 2016 मध्ये संस्थाचालकांकडून पाच लाखांची मागणी केली होती. पण कोणतीही दाद न मिळाल्याने ती सर्व माहिती त्यांनी राष्ट्रवादीचे वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांना दिली होती. 

तक्रारी थांबविण्यासाठी खंडणीची मागणी 

गुंजाळकर यांनी आपल्या पदाचा वापर करून आणि काही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून त्याच्या महापालिका, पोलिस यांच्याकडे कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या होत्या. तक्रारी थांबविण्यासाठी कदम यांच्यामार्फत पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप या प्रकरणात गुंजाळकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चव्हाण यांनी आज (ता. 31) रात्री गुंजाळकर, मनसेचे कदम यांच्याबाबत खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. 
 
Web Title: NCP Leader Arrested for Demanding money Education Institution