esakal | गृहनिर्माण प्रकल्प फसवणूक प्रकरण : पंकज, समीर भुजबळ दोषमुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गृहनिर्माण प्रकल्प फसवणूक प्रकरण : पंकज, समीर भुजबळ दोषमुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पाच वर्षापूर्वीच्या एका गृहनिर्माण प्रकल्पासंबंधित फसवणुकीच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मुलगा पंकज (Pankaj) आणि पुतण्या समीर (Sameer) यांच्यासह चौघांना विशेष न्यायालयाने बुधवारी निर्दोष जाहीर केले.

पंकज आणि समीर यांनी सन 2015 मध्ये विकासक राजेश धारप आणि सत्यन केसरकर यांच्या देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लिने रायगड जिल्ह्यातील सुमारे पंचवीस एकर जमिनीवर हेक्सवर्ल्ड हा ग्रुहनिर्माण प्रकल्प सुरू केला. मात्र यासाठी रितसर परवानगी आणि नियमांचे पालन केले नाही, असा आरोप त्यांच्या वर ठेवण्यात आला होता. ज्या भूखंडावर हा प्रकल्प सुरू केला ती जमीन त्यांच्या नावावर नाही, सुमारे 2344 सदनिका विक्रीचा दावा करुन ग्राहकांना चुकिची माहिती दिली, असे आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आले होते. तळोजा आर्थिक गुन्हा विभागात त्यांच्या वर तक्रार दाखल करण्यात आली होती.

हा गुन्हा रद्द करण्यासाठी चौघांनी विशेष न्यायालयात याचिका केली होती. विशेष न्या एच एस सातभाई यांच्या पुढे यावर सुनावणी झाली.

हेही वाचा: "पोक्‍सो' कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल

कायद्यानुसार विकासक खरेदीदारांकडून २० टक्के रक्कम कोणताही करार न करता घेऊ शकतात. संबंधित प्रकऱणात विकासकांनी केवळ १० टक्के रक्कम घेतली होती आणि प्रकल्पाच्या विकासासाठी त्याचा वापर केला होता. त्यामुळे खरेदीदारांकडून सदर रक्कम अवैधपणे घेतलेली नाही, असा युक्तिवाद अर्जदारांकडून करण्यात आला. तसेच विकासक कंपनीने जमीन संपादित करण्यासाठी सुमारे १३५ कोटी रुपये खर्च केले असल्याचा दावाही भुजबळ यांच्या वतीने वकील सुदर्शन खवसे आणि सेजल यादव यांनी केला. न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेतली आणि चौघांचीही फसवणुकीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

loading image
go to top