esakal | धनंजय मुंडेंविरोधात अत्याचाराची तक्रार; मुंडेंचा सविस्तर खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

dhananjay munde clarification on rape allegation

राज्याचे सामाजिक न्याय आणि विधी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात अत्याचाराची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी स्वतः खुलासा केला आहे.

धनंजय मुंडेंविरोधात अत्याचाराची तक्रार; मुंडेंचा सविस्तर खुलासा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय आणि विधी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात अत्याचाराची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी स्वतः खुलासा केला आहे.  त्यांच्या विरोधात एका महिलेने मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना निवेदन दिले आहे.

ओशिवरा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, मुंडे यांच्या विरोधात कोणतिही कारवाई झाली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली. 

हे वाचा - किरीट सोमय्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केला नवा आरोप

काय आहे प्रकरण? 
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने 10 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. तक्रारदार महिलेने तक्रारीची कॉपी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी याची दखल घेतली असून, आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याविषयावर खुलासा केला आहे. संबंधित महिलेच्या बहिणीशी 2003पासून सहमतीने संबंध होते. त्यातून एक मुलगा आणि मुलगी अशी मुलेही झाली. त्यांना माझे नाव दिले असून, त्यांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या कुटुंबियांना आणि मित्र परिवारालाही हे महिती असून, त्यांनी मुलांचा स्वीकारही केला आहे, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुक पेजवर शेअर केली आहे.

loading image