Hasan Mushrif : मुश्रीफ साहेब आमच्यासाठी देव माणूस; सरकारी बंगला सोडताना रुग्णांना अश्रू अनावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अखेर सरकारी बंगला सोडला आहे.

मुश्रीफ साहेब आमच्यासाठी देव माणूस; सरकारी बंगला सोडताना रुग्णांना अश्रू अनावर

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (NCP) आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अखेर सरकारी बंगला सोडला आहे. मुश्रीफांच्या सरकारी बंगल्यात रुग्णांच्या उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांची मोफत राहण्याची सोय करण्यात येत होती. मात्र राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार कोसळून भाजप (BJP), शिंदे गटाचं सरकार आलं आहे. सत्ता गेल्यामुळं हसन मुश्रीफांनी मुंबईतला सरकारी बंगला सोडला आहे.

सरकारी बंगला सोडतानाचे दृष्य हे मोठे भावूक करणारे होते. मुश्रीफांच्या बंगल्यात राहणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बंगला सोडताना मुश्रीफांचे आभार मानले. दरम्यान, मंत्रीपद मिळाल्यानंतर मुश्रीफांना हा बंगला देण्यात आला होता. परंतु, ते मंत्रीपद काळात या बंगल्याचा कधीच वापर करत नसतं. कारण, राज्यातील विविध भागातून मुंबईला कामासाठी येणाऱ्या लोकांना ते हा बंगला निवारा म्हणून देत असतं.

हेही वाचा: UP : 15 ऑगस्टनंतर भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; दलित-ब्राह्मण नेत्यांची नावं चर्चेत

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांना त्यांचा बंगला खाली करावा लागत असल्यानं राज्यातील रुग्णांना आता आधार कोणत्या बंगल्याचा हाच प्रश्न पडल्यानं रुग्णांनी काल त्यांचा बंगला सोडताना जड अंत:करण केलं. रुग्णांच्या हक्काचं घर समजला जाणारा मुंबईतील हसन मुश्रीफ यांचा सरकारी बंगला मुश्रीफ यांनी सत्ता जाताच खाली केला. त्यामुळं अनेक रुग्णांनी जड अंतःकरणानं हा बंगला खाली केला. मुश्रीफ साहेब आमच्यासाठी देव माणूस आहेत, असं सांगत रुग्णांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा: Nashik : नाशिकमध्ये 'एफडीए'ची मोठी कारवाई; 1 कोटींचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

Web Title: Ncp Leader Hasan Mushrif Left The Government Bungalow In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..