esakal | Drug case: 'त्या' तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन, राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

Drug case: 'त्या' तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन, राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी कॉर्डीलिया क्रूझ रेव्ह पार्टी (rave party) प्रकरणात नवीन खळबळजनक खुलासा केला आहे. क्रूझवरुन NCB ने आठ नाही, तर ११ जणांना ताब्यात घेतलं होतं असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. "ज्या दिवशी क्रूझवर NCB ने छापे टाकले, त्यावेळी समीर वानखेडे (sameer wankhede) 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतलं असं म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. असं नवाब मलिक म्हणाले. एक तर आठ लोकांना ताब्यात घेतलं असेल किंवा दहा. पण सत्य वेगळं आहे. एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आठ लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या" असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

ताब्यात घेतलेल्या अकरा जणांमध्ये रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवला या तिघांना सोडण्यात आलं. या तिघांना का सोडण्यात आलं? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारलं आहे. रिषभ सचदेव हा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे नातेवाईक आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला.

"ताब्यात घेतलेल्या अकरा जणांमध्ये रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवला या तिघांना सोडण्यात आलं. या तिघांना का सोडण्यात आलं? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारलं आहे. रिषभ सचदेव हा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचा नातेवाईक आहे" असा दावा नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा: पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरीजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार

"रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना का सोडलं? या प्रश्नाचं उत्तर समीर वानखेडेंनी द्यावं. 1300 लोक असलेल्या जहाजावर रेड टाकली. त्यात 11 लोकांना ताब्यात घेतलं. त्यांना NCB कार्यालयात आणले. मग या तीन लोकांना सोडण्यासाठी कुणाचे फोन आले? दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी फोन केले" असा आरोप नवाब मलिक यांनी केले.

loading image
go to top