esakal | शरद पवारांचे खंदे समर्थक नरहरी झिरवाळ यांना मिळालं 'हे' मोठं पद
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांचे खंदे समर्थक नरहरी झिरवाळ यांना मिळालं 'हे' मोठं पद

शरद पवारांचे खंदे समर्थक नरहरी झिरवाळ यांना मिळालं 'हे' मोठं पद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसकडे विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार तर विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचं ठरलं होतं मात्र अद्याप उपाध्यक्षांची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. अशात आज विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. 

मोठी बातमी - सॅनिटायझरचा अतिवापर आहे प्रचंड हानिकारक, वाचा सॅनिटायझरच्या अतिवापराचे तोटे

झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. विधानसभा उपाध्यक्षपदासाठी भाजपाकडूनही अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र भाजपकडून आज अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आदींसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही अभिनंदन केले आहे. 

नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांचे खांदे समर्थक आहेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या सावटामुळे आज संपवण्यात आलं. अशात शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. 

मोठी बातमी - गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे म्हणजे आजारांना आमंत्रण, वाचा रिपोर्ट
 
नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल 

  • नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे आमदार
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ओळख 
  • 2004 साली नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता.
  • 2009 च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या धनराज महाले निवडणुकीत हरवलं होतं 
  • २०१४ मध्ये नरहरी झिरवाळ पुन्हा निवडून आलेत. २०१९ मध्ये देखील झिरवाळ यांनी 60 हजार 813 च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला 

नरहरी झिरवाळ यांचा हा किस्सा माहितीये ना ?

पहाटे पहाटे अजित पवार यांच्या साथीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यावेळी जे आमदार बेपत्ता होते त्यामध्ये नरहरी झिरवाळ हे देखील होते. अशात काही दिवसानंतर हेच नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सापडले होते. ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं नरहरी झिरवाळ यांनी त्यावेळी म्हंटल होतं. 

ncp mla narahali zirawal elected as deputy speaker of maharashtra vidhansabha