'राष्ट्रवादी'चे संविधान बचावासाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - भाजप हटाव..देश बचाव..संविधान की शानमें राष्ट्रवादी कॉंग्रेस मैदानमे..मुर्दाबाद...मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद...मनुवाद्यांना अटक करा... अशा घोषणा देत चेंबूर येथे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज जोरदार आंदोलन केले.

दिल्लीमध्ये समाजकंटकांनी संविधान जाळल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन कळ्रून या आंदोलनाची सुरवात करण्यात आली. या वेळी भाजप सरकार आणि मनुवाद्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. शिवाय संविधान जाळणाऱ्यांना फाशी द्या, अशीही जोरदार मागणी करत मोर्चेकरांनी निषेधही केला. या वेळी मनुस्मृतीचे दहनही करण्यात आले.

Web Title: NCP Movement for the protection of the Constitution