मोठी राजकीय घडामोड : अजित पवारांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे मंत्रालयात

सुमित बागुल
Thursday, 13 August 2020

आज सकाळपासून अजित पवार मंत्रालयात आहेत. सकाळपासूनच अजित पवार यांची कामं सुरु आहेत.

मुंबई : मुंबईतून आजही मोठ्या राजकीय घडामोडी समोर येतायत. कालच्या शरद पवारांच्या पार्थ पवारांबाबत व्यक्त केलेल्या मतानंतर आजच्या राजकीय घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत. कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आज सकाळी छगन भुजबळ यांचीही पार्थ पवारांबाबत आपलं मत मांडलं. पार्थ पवारांबाबत बोलताना 'नया हैं वह' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली होती. 

काल 'सिल्व्हर ओक'वर चर्चा...

कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवार स्वतः शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले होते. त्यावेळी सुप्रिया सुळे या देखील तिथं उपस्थित होत्या असं समजतंय. दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  मंत्रालयात गेलेल्या आहेत. काल अजित पवार यांनी सिल्व्हर ओक वर जाणं आणि आज सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेणं याला पार्थ पवारांच्या विषयी शरद पवारांनी केलेल्या विधानाची पार्श्वभूमी असू शकते असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. 

मोठी बातमी - आजोबांनी पार्थ पवारांना फटकारलं, काकांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

सकाळपासून अजित पवार मंत्रालयात 

आज सकाळपासून अजित पवार मंत्रालयात आहेत. सकाळपासूनच अजित पवार यांची कामं सुरु आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे या देखील अनेकदा मंत्रालयात जात असतात. आज सुप्रिया सुळे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील अजित पवारांच्या कार्यालयात गेल्याची माहिती समोर आलीये.  त्यामुळेच राजकीय परिघात पुन्हा एकदा चर्चा रंगताना पाहायला मिळतायत. 

मोठी बातमी - पार्थ यांच्यावरील 'कवडीची किंमत देत नाही' मतानंतर आज NCP च्या बड्या नेत्यानं म्हटलं 'नया है वह

'ती' पार्श्वभूमी नाही 

आज सकाळपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या यशवंतराव चव्हाणमध्ये होते. तिथे काम संपवून आता सुप्रिया सुळे मंत्रालयात अजित पवारांना भेटायला गेल्यात. दरम्यान, आताच्या सुप्रिया सुळे यांच्या अजित पवारांसोबतच्या बैठकीला पार्थ पवारांबाबच्या वक्तव्याची पार्श्वभूमी नसल्याची माहिती समोर येतेय. 

ncp mp supriya sule reached matralaya to meet ajit pawar important political update  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp mp supriya sule reached matralaya to meet ajit pawar important political update