Kapil Patil : पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीला दोन अंकी आकडा गाठता आलेला नाही; कपिल पाटील यांचा शरद पवार आणि काँग्रेसला टोला

काँग्रेसची जशी न्याययात्रा पुढे सरकते तसे काँग्रेसचे मोठे नेते भाजप मध्ये सामील होतात.
Kapil Patil
Kapil Patilsakal

डोंबिवली - पक्ष स्थापन झाल्यापासून दोन अंकी आकडा राष्ट्रवादीला गाठता आला नाही. राहिला विषय काँग्रेसचा तर जशी जशी न्याय यात्रा पुढे सरकते तस तसे काँग्रेसचे मोठे नेते भारतीय जनता पक्षात सामील होत आहेत असे म्हणत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की, 50 टक्के जागा मविआ जिंकणार, भाजपला विजयाची खात्री नाही. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा असे सांगत पवार यांनी भाजपवर टीका केली होती. यालाच आता भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील उत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की पवार साहेब फार मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर काय बोलू. राज्यातील तिन्ही नेते आणि तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या तिन्ही पक्षांनी आठवले साहेबांसोबत शाश्वत केलेल आहे. 41 ते 45 च्या दरम्यान महायुतीच्या जागा निवडून येतील. त्याचं एकमेव कारण असं आहे या देशांमध्ये विकासाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो विश्वास निर्माण केलेला आहे.

या विश्वासाच्या जोरावर देशातील जनतेने संकल्प केला आहे. फिर एक बार मोदी सरकार अब की बार 400 पार, कुठला पक्ष असे सांगेल की आमच्या कमी जागा निवडून येणार. पक्ष स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीने दोन अंकी आकडा राष्ट्रवादी पक्षाला गाठता आला नाही. राहिला विषय काँग्रेसचा जस जशी न्याय यात्रा पुढे सरकते तसे तसे काँग्रेसचे मोठे नेते भारतीय जनता पक्षात सामील होतात.

आता आपण जे काही स्लोगन्स सांगितलं त्या स्लोगनवर एवढेच म्हणेल अशोक चव्हाण सारखा माणूस दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेला. त्यांना पक्ष बदलताना नाही वाटत कोणाच्या सल्ल्याची गरज आहे. काहीतरी त्यांना त्रास असेल त्याच्याशिवाय पक्ष बदलेल का कोणी. त्याच्यामुळे त्यांच्या काही भावना कोणत्यातरी माध्यमावर त्यांनी मुलाखत देत त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com