'वास्तव नाकारुन चालणार नाही', शरद पवारांनी महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

दीनानाथ परब
Thursday, 8 April 2021

बंधन आणली की अस्वस्थतता येते.

मुंबई: राज्याच्या वेगवेगळया भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये नाराजी, एकप्रकारच्या अस्वस्थततेची भावना आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजा फेसबुक लाईव्हद्वारे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन, सर्वांना सहकार्य करण्याची विनंती केली. 

"राज्यातील आरोग्य यंत्रणेचे घटक डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट करतायत. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नाईलाजाने कोरोना साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यामनुसार काही कठोर निर्बंध लागू करावे लागतायत. त्याला काही पर्याय नाही" असे शरद पवार म्हणाले. 

"कालच मी देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. काही कमतरता आहेत, त्याबद्दल त्यांच्याशी बोललो.  केंद्र सरकार, आरोग्य खातं महाराष्ट्राच्या पाठिशी आहे, असा विश्वास त्यांनी दिला. त्यांची मदत आणि आपल्या सामूहिक प्रयत्नातून आपण मार्ग काढायचा आहे" असे शरद पवार म्हणाले.  

'व्यक्तीचं जीवन महत्वाचं आहे पण...', देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारसाठी सूचक वक्तव्य

"बंधन आणली की अस्वस्थतता येते.  शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकाला संकटामुळे फार मोठी झळ बसतेय. दुकाने, व्यवसाय बंद झाल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. भाजी, फळ नाशिवंत शेतीमाल आहे. त्यामुळे .शेतकऱ्यासमोरही प्रश्न आहे. शेतकरी वर्गाचेही नुकसान होत आहे. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्याने आणि सामूहिकपणे सामोर गेलं पाहिजे त्याला पर्याय नाही" असे शरद पवार यांनी सांगितले. 

मुंबई आणि उपनगरात आज पावसाची शक्यता

"आपणाला वास्तव नाकारुन चालणार नाही. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही अपरिहार्य निर्णय राज्य सरकारला घ्यावे लागत आहेत. असे निर्णय घेतले जात आहेत, त्यासाठी सर्वाचं सहकार्य आवश्यक आहे. आपणा सर्वांना प्रसारमाध्यमांना, राजकीय नेत्यांना, सर्वांना विनंती आहे. की परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन, राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य माणूस अशा संकटकाळात यंत्रणेला सहकार्य देईल. या सामुदायिक प्रयत्नातून कोरोनावर आपण निश्चित मात करु" असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ncp presiden sharad pawar appeal to people of maharashtra