मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीला धक्का 

ncp2
ncp2

भाईंदर ः मीरा भांईदरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची गळती काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या निवडणुकीला माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सुरु झालेली हि गळत आजही सुरु आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला दुबोले हे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, मीरा भाईंदर राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे गिलबर्ट मेंडोसा आणि गणेश नाईक यांची काँग्रेस म्हणून ओळखली जात होती. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरु झाली. त्यातून गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाईंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेस टिकवण्याचा प्रयत्न केला होता, गिलबर्ट मेंडोसा यांच्या काळातील जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांनी भाजपची वाट पकडली. तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी हाताचे घड्याळ काढून पंज्याला जवळ केले. दरम्यानच्या काळात गणेश नाईक यांनी आपली पकड राखण्यासाठी इतर कोणाला जिल्हाध्यक्ष न करता आपले समर्थक प्रकाश दुबोले यांच्याकडेच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

महापालिका निवडणुकीच्या वेळी संजीव नाईक यांनी भाजपला मदत होईल अश्या तरहेने उमेदवार दिल्याचा आरोप करण्यात आला होता. गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नाईक समर्थक सुद्धा भाजपच्या वाटेवर जाऊ लागल्याने मीरा भाईंदरमधील उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस हि संपणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com