Jitendra Awhad
sakal
ठाणे : शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी नाकारली म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. गुरुवारी कोकण भवन येथे गट नोंदणीवेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या खेळीमुळे ठाणे महापालिकेत १२ नगरसेवकांच्या बळावर स्वीकृत नगरसेवक निवडून आणण्याची राष्ट्रवादी शरद पवार गटाची संधी हुकणार आहे.