
ठाणे : पक्षाला लागलेली गळती थांबवण्यापेक्षा नवीन नेते आणि कार्यकर्ते घडवण्याच्या दृष्टीने ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार सोमवारी पक्ष प्रवेशाचा नारळ फोडत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधीमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शहरातील एमएआयएम काँग्रेस आणि विविध सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.