ठाणे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या ‘सनातनी दहशतवाद’ उल्लेखावरून वाद निर्माण झाला असतानाच आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सनातनी धर्माने भारताचे वाटोळे केले अशी टिप्पणी केली आहे. सनातनी दहशतवाद हा हजारो वर्षांपासून अस्तित्वात होता आणि पुढील हजारो वर्षे अस्तित्वात राहिल. जोपर्यंत वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले.