
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीवरून चांगलेच राजकारण तापले आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलैला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यात या मोर्चाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील पाठींबा देत ५ जुलैच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील या मोर्चाला पाठींबा दिला आहे.