
NCP sharad pawar group office bearers join Shinde faction
ESakal
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा एकदा राजकीय धक्का बसला आहे. माजी नगरसेवकांनंतर आता राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ३०) ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला.