काँग्रेसला शालजोडीतले हाणत प्रफुल्ल पटेल यांनी दिला स्वबळाचा नारा

दीपा कदम
Tuesday, 13 October 2020

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती

मुंबई, ता. 13 - राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली. काँग्रेस इतर पक्षांना महत्त्व देत नसल्याचा टोलाही प्रफुल्ल पटेल यांनी  हाणला आहे. 

महत्त्वाची बातमी : अनिल परब यांना तातडीने लिलावतीमध्ये हलवलं, मुख्यमंत्र्यांनी रद्द केली मातोश्रीवरील बैठक

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहील, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राष्ट्रीय जनता दलचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती. आम्ही जास्त जागांसाठी आग्रही देखील नव्हतो. पण एकत्र लढण्याची काँग्रेसची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे प्रफुल पटेल म्हणाले. 

महत्त्वाची बातमी : कोश्यारी विरुद्ध ठाकरे सामना; फायरब्रँड नेते संजय राऊत म्हणतात "मुख्यमंत्र्यांचं उत्तर म्हणजे ऐतिहासिक दस्ताऐवज

एकत्र येऊन बीजेपी आणि जदयूचा मुकाबला केला पाहिजे असे एकीकडे म्हणतात. मात्र दुसरीकडे इतर पक्षांना महत्त्व देत नाहीत, ही काँग्रेसची भूमिका दुर्दैवी असल्याची खंत पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.

NCP will contest bihar election by their own prafulla patel says in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP will contest bihar election by their own prafulla patel says in mumbai