esakal | कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

corona-hospital.jpg

या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी अद्याप आयसीयू सुरू करण्यात आलेले नाही.

कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं आंदोलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान आणि रुग्णांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. पालिकेच्या कुर्ला एल वॉर्डच्या हद्दीत भाभा रुग्णालय आहे. 

या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी अद्याप आयसीयू सुरू करण्यात आलेले नाही. रुग्णांना पाणी मिळत नाही. रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आल्यास त्याला ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाही. गेले दीड महिना रुग्णालयात औषधे नसल्याने रुग्णांना बाहेरून आर्थिक भुर्दंड सहन करून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. 

दादरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी फाडले दुकानांवरील सरकारच्या निषेधाचे स्टिकर्स

पालिकेने रुग्णालयांना लागणारी औषधे विकत घ्यावीत असे आदेश दिले आहेत. मात्र कुर्ला भाभा रुग्णालयात औषधे विकत घेतली जात नाहीत. यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने सहाय्यक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. रुग्णांना सोयी सुविधा देण्याकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप डॉ. सईदा खान यांनी केला.
 

loading image