बदलापूर: महावितरणच्या अभियंत्याची केली आरती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

वीज गेल्यानंतर सर्वसामान्यांचे काय हाल होतात, याची जाणीव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्हावी या उद्देशाने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. आधीच वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेले आहेत.

नवी मुंबई - बदलापूर पश्चिम भागात भारनियमनाबरोबरच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने या विरोधात बदलापूर शहर राष्टवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बदलापूर महावितरणाच्या कार्यालयातील अभियंत्याची हार घालून आणि नंतर त्यांची आरती ओवळून गांधीगिरी करत अनोखे आंदोलन केले.

यावेळी महावितरणच्या गचाळ कारभाराविरोधात एक खास आरती तयार करून ती म्हणण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान महावितरण च्या कार्यालयातील वीज पुरवठा तासभर खंडित करण्यात आला होता.

वीज गेल्यानंतर सर्वसामान्यांचे काय हाल होतात, याची जाणीव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्हावी या उद्देशाने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. आधीच वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. अशात बदलापूर पश्चिमेकडील वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला.

Web Title: ncp workers perform aarti andolan over electricity issues

व्हिडीओ गॅलरी