esakal | वाड्यात राष्ट्रवादीचा बोलबाला पाचपैकी तीन जागांवर विजय
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

वाड्यात राष्ट्रवादीचा बोलबाला पाचपैकी तीन जागांवर विजय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडा : वाडा तालुक्यात झालेल्या : जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला असून पाच जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकावला आहे. आबिटघर गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भक्ती वलटे या निवडून आल्या आहेत.

त्यांना ३६७९ इतकी मते मिळाली, शिवसेनेच्या उमेदवार दिव्या म्हसकर यांना तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले. जिल्हा परिषदेच्या गारगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी शेलार यायांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार नीलम पाटील यांचा पराभव केला. रोहिणी शेलार या १८४२ इतक्या मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पालसई गटात शिवसेनेच्या मिताली बागुल या निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मोज गटात शिवसेनेचे अरुण ठाकरे विजयी झाले आहेत.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

मांडा गटात राष्ट्रवादीच्या अक्षता चौधरी या पुन्हा विजयी झाल्या आहेत. पंचायत समितीच्या सापने बुद्रुक गणात शिवसेनेच्या दिष्टी मोकाशी या निवडून आल्या आहेत.

loading image
go to top