Thane News: पाण्याच्या लाटेतही माणुसकीचा पूल! NDRF ची हृदयस्पर्शी कामगिरी, अंत्यसंस्कारासाठी धावली टीम

NDRF Team: एका महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला असून एनडीआरएफ टीमने महिलेचा मृतदेह बोटीतून स्मशानभूमीपर्यंत पोहचविल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करता आले. या घटनेमुळे टीमच्या कार्याला सलाम देण्यात येत आहे.
NDRF Team
NDRF TeamESakal
Updated on

डोंबिवली : टिटवाळानजीकच्या एका रिहबिलेशन सेंटरमध्ये एका महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. मात्र जोरदार पावसामुळे साचलेल्या पाण्यातून महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी पर्यंत कसा घेऊन जायचा ? असा प्रश्न होता. त्याठिकाणी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या पुढाकारने एनडीआरएफ टीम पोहचली. या टीमने महिलेचा मृतदेह बोटीतून स्मशानभूमीपर्यंत पोहचविल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करता आले. या घटनेमुळे एनडीआरएफच्या टीमच्या कार्यालया सलाम देण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com