आरोग्य आणि वातावरणातील बदलांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता - तानाजी सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanaji Sawant

गृहनिर्माण आणि आरोग्य यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे. त्यामुळे आरोग्य, गृहनिर्माण आणि वातावरणातील बदल यांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे.

आरोग्य आणि वातावरणातील बदलांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता - तानाजी सावंत

मुंबई - गृहनिर्माण आणि आरोग्य यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे. त्यामुळे आरोग्य, गृहनिर्माण आणि वातावरणातील बदल यांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे केले.

डॉ. सावंत यांच्या हस्ते आज अर्बन हेल्थ, हाउसिंग आणि क्लायमेट चेंज या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बांद्रा कुर्ला संकुल येथील होटेल सोफिटेल येथे झालेल्या या कार्यशाळेत आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर फॉर यू आणि युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉक्टर फॉर यू एनजीओचे अध्यक्ष डॉ. रजत जैन, संस्थापक डॉ. रविकांत सिंग, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाषचंद गुप्ता, युनिसेफच्या देविका देशमुख, हिमांशू जैन आदी उपस्थित होते.

मुंबई शहरातील झोपडपट्टी आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हान आहे. झोपडपट्टींचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी सुधारीत घरे बांधली जात आहेत. यासाठी मुंबई महापालिका, मुंबई महानगर क्षेत्र प्रदेश विकास प्राधिकरण यांनी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, डॉ. सावंत यांनी सांगितले.

मुंबईतील विविध आव्हानांना सामोरे जात आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आरोग्याच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विविध क्षेत्राशी निगडीत आव्हानांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी होऊ शकेल का याचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंब्रिज विद्यापीठाच्या प्रा. रोनिता बर्धन, मोहम्मद खोराकीवाला, यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

टॅग्स :Mumbaihealth