कामगार टिकवायचा असेल तर सरकार बेदखल करण्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

शिवडी : महाराष्ट्र घडवणाऱ्या कामगारांचे हित लक्षात न घेता त्यांना रेटून नेण्याचे काम सरकार करीत आहे. कामगार आणि देश टिकवायचा असेल तर हे सरकार बेदखल करण्याची गरज आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मंगळवारी (ता. 1) एल्फिन्स्टन येथील कामगार क्रीडा भवनमध्ये भरवलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कामगार नेते भाई जगताप, कामगार प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते. 

भारतीय कामगार कर्मचारी महासंघ यांच्या वतीने जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन यानिमित्त कामगारांचा भव्य मेळावा एल्फिन्स्टन येथे झाला. मेळावा म्हणजे शक्तिप्रदर्शन नसून कामगारांच्या घामाचा, रक्ताचा दिवस आहे. देशात, राज्यात शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आत्महत्या करत आहेत; परंतु या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आता शेतकरी कुटुंबीयही आत्महत्या करू लागले आहेत. आज प्रगत महाराष्ट्र आर्थिक गुलामगिरीत वावरत आहे, हे केवळ मोदी सरकारच्या हुकूमशाही पद्धतीमुळेच, अशी टीका कामगार नेते भाई जगताप यांनी केली.

या वेळी कामगार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले ज्येष्ठ कामगार नेते पी. आर. कृष्णन यांना भीष्माचार्य पुरस्कार, एस. डी. डांगे यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर एन. एच. एस. मनी व महेंद्र डी. जोशी यांना औद्योगिक शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

Web Title: Need to remove BJP government to save workers, says Ashok Chavan