हिमालय पूल दुर्घटना नीरजकुमार देसाईला कोठडी

Neerajkumar-Desai
Neerajkumar-Desai

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्‍चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला न्यायालयाने 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी त्याला सोमवारी साकीनाका परिसरातून अटक केली होती.

महापालिका मुख्यालयाजवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतचा दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल मागील गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. त्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि 31 जण जखमी झाले. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. नीरजकुमार देसाई याच्या प्रो. देसाईज असोसिएटेड इंजिनिअरिंग कन्सल्टंट अँड ऍनालिसिस प्रा. लि. या कंपनीने 2016 मध्ये हिमालय पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले होते. त्याला तांत्रिक ज्ञान असल्यामुळे या गुन्ह्यात क्र. 304 (2) कलम वाढवण्यात आले आहे. या कलमांतर्गत दोषीला 10 वर्षांपर्यंत कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com